वनविभागाची दुटप्पी भूमिका: स्वमालकीच्या जागेतील काम बंद पाडण्यासाठी दबाव, पवार कुटुंबाचा गंभीर आरोप !

केडगाव प्रतिनिधी :- अशोक अडसूळ

एकीकडे वनविभागाच्या जागेवर झालेली मोठी अतिक्रमणे नजरेआड करायची आणि दुसरीकडे स्वताची मालकी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खाजगी जागेतील शेतीचे काम बंद पाडण्यासाठी दबाव निर्माण करायचा, असा प्रकार समोर आला आहे. पुरोगामी संघर्ष परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार यांच्या मालकीची जमीन गट नंबर २३३/२ ‘अ’ या जागेत सुरू असलेल्या लेव्हलिंगच्या कामावर वनविभागाने आक्षेप घेत काम बंद करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

सुरेश पवार यांच्या मालकीची ही जागा असून, त्यावर लेव्हलिंगचे काम सुरू होते. मात्र, वनविभागाचे वनरक्षक मदने हे सदर ठिकाणी आले व चालू असलेले लेव्हलींगचे काम बंद केले.त्यांना पवार यांनी काम बंद करण्याचे कारण विचारले असता त्यांनी मला माहीत नाही मला वनपाल विर मॅडम यांनी पाठवले असून काम बंद करायला सांगीतले आहे.त्यावर पवार यांनी वनपाल विर मॅडम यांना फोन लावण्यास सांगीतले तेव्हा वनरक्षक मदने यांनी विर यांना फोन लावला असता विर मॅडम यांनी काम बंद करण्याचे कारण न सांगता पवार यांच्याशी बोलण्यास नकार दिला. काम बंद न केल्यास मी तिथे फौजफाटा घेऊन येऊ का ? आम्ही काही अफगानिस्तान वरून आलो नाही.तेव्हा पवार यांनी तुम्ही स्वतः कागदपत्र घेऊन या व ही जमीन कोणाची आहे किंवा आमची तरी जमीन कोठे आहे ते दाखवा असे म्हटल्यावर तुमच्यात हिम्मत असेल तर शासकीय यंत्रनेच्या नादी लागा असे धमकावल्याने हा सरळ सरळ आमच्यावर अन्याय असल्याची भावना पवार कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. सदर संभाषणाचे संपूर्ण रेकॉर्डींग आमच्या प्रतिनिधींना प्राप्त झाले आहे.

पवार कुटुंबियांनी या प्रकरणावर बोलताना वनविभागाच्या दुटप्पी धोरणाचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, यापूर्वी त्यांनी स्वतः वनविभागाच्या हद्दिच्या खुना काही व्यक्तींनी उपटून फेकल्या आहेत तरी आपण येऊन त्या पुन्हा पुर्ववत कराव्यात असे लेखी निवेदन दिले होते.तसेच वनविभागाच्या जागेवर अनेकदा मोठी अतिक्रमणे झाली आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही वनविभागाने कधीच कोणतीही तत्परता दाखवली नाही. उलट तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे देऊन अजुन आमची हद्द फिक्स नाही,आमच्या जागेचा लवकरच सर्वे होणार आहे,सदरची जागा महसूल विभागाच्या ताब्यात आहे अशी दिशाभूल करणारी तोंडी व लेखी उत्तरे देण्यात आल्याचे पवार यांनी सांगीतले.मात्र आता खाजगी जागेतील कामे बंद करण्यासाठी वनविभागाचा हा उत्साह अनाकलनीय आहे

.एकंदरीत १) सदर शेतीकाम बंद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी का आले ? २) सदर जागा खाजगी असताना वनविभागाने अडकाठी का आणली ?३) शेतकऱ्यास त्याने काम बंद का करावे याचे स्पष्टीकरण का दिले नाही ? ४) सदर कामाबद्दल कोणाची तक्रार होती का ? ५) वनविभागाने काही आर्थिक देवाणघेवाण करून काम बंद करण्याचा प्रयत्न केला आहे का ? ६) कोणाच्या सांगण्याने हा सर्व प्रकार होत आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न आम्हाला पडल्याचे पवार यांनी सांगीतले.

आमच्या प्रतिनिधींनी दूरध्वनीवरून वनसंरक्षक राहूल काळे यांच्याशी संपर्क साधून सदर प्रकरणाबाबत विचारणा केली असता माझ्याकडे कोणतीही तोंडी अथवा लेखी तक्रार आली नसून सदर बाबत मला कसलीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगीतले.वनपाल विर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

वनविभागाकडून सुरू असलेला हा मनमानी कारभार आणि दबाव तंत्राचा आम्ही निषेध करतो, असे सांगत पवार कुटुंबियांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थिती तपासावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

वनविभागाने सदर जमीन नेमकी कोणाची वनविभागाची का खासगी मालकीची याची शहानिशा करून जर वनविभागाच्या जागेत अतिक्रमण झाले असेल तर झालेली सर्वच अतिक्रमणे निःपक्षपाती पणे काढून शासकीय जागा ताब्यात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

  • अशोक अडसूळ ( मुख्य संपादक )

    ​मी अशोक भागुजी अडसूळ, 'सत्यप्रकाश न्यूज'चा मुख्य संपादक. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे आणि समाजाचे प्रश्न मांडणे हे माझे ध्येय आहे. आमच्या पोर्टलची मूळ मूल्ये म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा होय. पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी आम्ही प्रसिद्ध करत नाही. आपल्या परिसरातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि समाजोपयोगी बातम्या वाचण्यासाठी आमच्याशी जोडून राहा.आमच्या या प्रवासात आपणही सहभागी व्हा. आपल्या भागातील बातम्या किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला 9561708090 या क्रमांकावर संपर्क करा.

    Related Posts

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वरवंड :- जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या १३ जुलै रोजी वरवंड मुक्कामी येत आहे. सदर सोहळ्यासाठी महाराष्ट शासन व वरवंड ग्रामपंचायतच्या वतीने…

    Continue reading
    दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

    बोरीपार्धी : दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा गुरुवारी दिनांक-९.७.२०२६ रोजी श्री बोरमलनाथ मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार…

    Continue reading

    हे नक्की वाचा

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले !

    डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले !

    विटगन इंडिया प्रा. लि.कंपनीने वारकऱ्यांसाठी नित्यउपयोगी वस्तूंच्या किट वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी !

    विटगन इंडिया प्रा. लि.कंपनीने वारकऱ्यांसाठी नित्यउपयोगी वस्तूंच्या किट वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी !

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; मोफत औषधांचे वाटप !

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; मोफत औषधांचे वाटप !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

    दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !