बोरमलनाथ देवस्थानच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम ? उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश !

बोरमलनाथ देवस्थान इनाम जमिन गट नंबर १४४ मध्ये सुरु असलेले बांधकाम.

बोरीपार्धी येथील बोरमलनाथ देवस्थानच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे तहसीलदारांना आदेश.

केडगाव प्रतिनिधी :- अशोक आडसुळ

दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील बोरमलनाथ देवस्थानच्या जागेवर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामां बाबत उपविभागीय अधिकारी, दौंड यांनी गंभीर दखल घेत तहसीलदारांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

बोरीपार्धी येथील ग्रामसभेने ठराव केला होता की,बोरमलनाथ देवस्थान ट्रस्ट मध्ये ग्रामस्थांना सहभागी करून घेतल्याशिवाय बोरमलनाथ मंदिर परिसरात व देवस्थान जमिनीत ग्रामस्थांना विचारात घेतल्याशिवाय व ग्रामसभेच्या ठरावाशिवाय कोणतेही काम करू नये तरी देखील बोरमलनाथ देवस्थान ट्रस्टचे सदस्य रमेश एकनाथ शेलार यांनी ग्रामसभेच्या ठरावाला झुगारून कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय बेकायदेशीर बांधकाम सुरू केले होते.

त्यामुळे बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीच्या सदस्यांनी यासंदर्भात उपविभागीय कार्यालयाकडे लेखी तक्रार करून. बोरीपार्धी येथील बोरमलनाथ देवस्थान जमिन जुना गट नंबर ५२८ (नवीन गट नंबर १४४) या देवस्थानच्या जमिनीवर रमेश एकनाथ शेलार हे कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करत आहेत सदर बाधकाम तात्काळ थांबवून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती.तसेच यापूर्वीही याच विषयावर २७ जून २०२५ रोजी बचाव समितीने लेखी तक्रार केली होती परंतू प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी दौंड तहसीलदारांना तातडीने पुढील कार्यवाही करून, केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते व नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात यावी अश्या सुचना देण्यात आल्या होत्या.त्याप्रमाणे तहसीलदार दौंड यांनी बोरीपार्धी मंडल अधिकारी बनसोडे साहेब यांना लेखी आदेश देऊन सदर प्रकरणाबाबत तात्काळ नियमाप्रमाणे कार्यवाही करून तसा सविस्तर अहवाल या कार्यालयास सादर करून तक्रारदारास तसे अवगत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • अशोक अडसूळ

    ​मी अशोक भागुजी अडसूळ, 'सत्यप्रकाश न्यूज'चा मुख्य संपादक. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे आणि समाजाचे प्रश्न मांडणे हे माझे ध्येय आहे. आमच्या पोर्टलची मूळ मूल्ये म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा होय. पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी आम्ही प्रसिद्ध करत नाही. आपल्या परिसरातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि समाजोपयोगी बातम्या वाचण्यासाठी आमच्याशी जोडून राहा.आमच्या या प्रवासात आपणही सहभागी व्हा. आपल्या भागातील बातम्या किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला 9561708090 या क्रमांकावर संपर्क करा.

    Related Posts

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    पिंपळे गुरव :-दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रारंभ तसेच शाळेच्या नवीन बुद्धविहार इमारतीचा पायाभरणी समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमास शाळेचे स्थानिक अध्यक्ष…

    Continue reading
    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वरवंड :- जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या १३ जुलै रोजी वरवंड मुक्कामी येत आहे. सदर सोहळ्यासाठी महाराष्ट शासन व वरवंड ग्रामपंचायतच्या वतीने…

    Continue reading

    हे नक्की वाचा

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !