दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

दापोडी : संदिप चव्हाण
नुकतीच दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक पार पडली त्यामध्ये विजय हनुमंत भांडवलकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.सदर निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली.

उपसरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विजय भांडवलकर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असुन ग्रामस्थांच्या सहकार्याने दापोडी गावाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पाणी, रस्ते, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांसाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची भावना व्यक्त करून उपसरपंच पदी एकमताने बिनविरोध निवड केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.

या निवडीबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विजय भांडवलकर यांचा पुष्पहार घालून सत्कार करून आनंद व्यक्त करण्यात आला.आपल्या नेतृत्वात ग्रामविकासाला नवी उंची मिळो अशा शुभेच्छा देऊन ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच विजय भांडवलकर यांचे अभिनंदन केले.दापोडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकता, विकास, स्वच्छता, शिक्षण, पारदर्शकता आणि प्रगती या उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

  • संदिप चव्हाण

    संदीप चव्हाण हे 'सत्यप्रकाश न्यूज'चे अधिकृत लेखक/प्रतिनिधी आहेत. सामाजिक, राजकीय आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण करणे आणि अचूक बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या परिसरातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात.त्यांनी यापुर्वी अनेक वृत्तपत्रात प्रतिनिधी म्हणून काम केले असल्याने त्यांना पत्रकारितेचा चांगला अनुभव आहे.

    Related Posts

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    बोरीपार्धी :- अशोक अडसूळबोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून व खोटी कागदपत्र सादर करून उभारलेल्या बेकायदेशीर दवाखान्यावर कारवाई कधी होणार ? तक्रार करून दोन महीने उलटून गेले पण अजुनही…

    Continue reading
    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    दापोडी, ता. दौंड : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दापोडी येथे यंदा भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्याने आयोजित हा आध्यात्मिक सोहळा…

    Continue reading

    हे नक्की वाचा

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

    लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !