वनविभागाच्या जागेत उभी असलेली बेकायदेशीर इमारत.

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश.
केडगाव – बोरीपार्धी,ता.दौंड,जि.पुणे येथील बोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेत नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालय एवं पंचकर्म केंद्र या नावाने बेकायदेशीर दवाखाना सुरू असलेबाबत बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीच्या सदस्यांनी तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समीती दौंड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.त्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले होते की,बोरमलनाथ मंदिर परिसरात वनविभागाच्या जागेत बोरमलनाथ देवस्थान पुजारी यांनी बेकायदा,बिगरपरवाना एक तिन मजली ईमारत बांधली असून तिमध्ये एक आयुर्वेदिक दवाखाना चालू आहे. सदर दवाखान्याची चौकशी करून जर दोषी अढळल्यास दोषींवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी केली होती.त्या अनुशंगाने तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समीती दौंड डाॅ.उज्वला जाधव यांनी तात्काळ दखल घेत वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र केडगाव यांना आपण आपल्या टिमसह सदर ठिकाणी भेट देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून आपले स्तरावरावर नियमोचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाही बाबत तक्रारदार व ग्रामपंचायत कार्यालय बोरीपार्धी यांना अवगत करावे व केलेल्या कार्यवाहीची एक प्रत इकडील कार्यालयास सादर करावी असा लेखी आदेश देण्यात आला आहे.
rप्राथमिक आरोग्य केंद्र केडगावच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.निलिमा लोखंडे यांची बचाव समितीच्या सदस्यांनी भेट घेतली असता त्यांनी सदर बाबत आम्ही चौकशी करत असुन चौकशी पुर्ण झाल्यावर योग्य ती कार्यवाही करू असे सांगीतले आहे.आता वैद्यकीय अधिकारी काय कार्यवाही करतात हे पहावे लागेल.



