नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याला महावितरणचे अभय.

केडगाव (प्रतिनिधी) -बोरीपार्धी,ता.दौंड,जि.पुणे.येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात एक तिन मजली इमारत उभी असून तिच्या मध्ये नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालय एवं पंचकर्म केंद्र डाॅ.निलेश कैलास शेलार चालवित आहे. बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीने वनबलप्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर,जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सदर इमारत विनापरवाना,बेकायदेशीर रित्या वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधली असुन सदर अतिक्रमण करणारांवर कायदेशीर कारवाई करून झालेले अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यात यावे याबाबत लेखी तक्रार दिली असुन वन विभागाने सदर अतिक्रमणा बाबत वन गुन्हा दाखल केला असून तसा सविस्तर पंचनामा देखील केला आहे व लवकरच पुढील कारवाई होणार असल्याचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगीतल्याचे बोरमलनाथ बचाव समितीचे उपाध्यक्ष व पुरोगामी संघर्ष परिषदेचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगीतले.

सदर इमारतीत नाथसखा आयुर्वेदिक दवाखाना सुरू असुन दवाखान्यास विद्युत मंडळाकडून अधिकृत लाइट कनेक्शन नसल्याची माहीती बचाव समितीस मिळताच बचाव समितीने दिनांक-१३.६.२०२५ रोजी कार्यकारी अभियंता केडगाव, अधिक्षक अभियंता ग्रामिण सर्कल बारामती,मुख्य अभियंता उर्जा भवन बारामती यांच्याकडे विजचोरी बाबत तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्याप्रमाणे बोरमलनाथ मंदिर परिसरातील व देवस्थान जमिनीतिल बेकायदेशीर लाईट कनेक्शनवर कारवाई साठी विद्युत मंडळाची एक टिम आली होती.सदर टीमने कारवाई करून काही लाईट कनेक्शन बंद केली व विजचोरी केलेल्या कनेक्शनवर दंडात्मक कारवाई करत असल्याचे विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले होते.परंतू त्याबाबत आद्याप पर्यंत दंड केल्याची कुठलीच माहीती विद्युत मंडळाकडून बचाव समितीच्या सदस्यांना मिळाली नाही. उलट त्याच ठिकाणी पुन्हा बेकायदेशीर कनेक्शन जोडून विजचोरी सुरू असल्याची माहीती बचाव समीतिच्या सदस्यांनी दिली.

सदर इमारतीत वातानुकूलित यंत्रणा(AC) विविध प्रकारच्या मशनरी व लाईट सुरू आहे मग सदर इमारतीस विद्युत मंडळाचे अधिकृत कनेक्शन नसताना सदरची लाईट कुठून आली जर अधिकृत विद्युत कनेक्शन नसताना दुसरीकडून घरगुती वापराची लाईट घेतली असेल आणी दवाखान्याला वाणिज्य (कमर्शियल) कनेक्शनची गरज असताना बेकायदेशीर वीज जोडली असेल तर हा वीज चोरीचा गुन्हा असल्याचे मत बचाव समितीच्या सदस्यांनी मांडले आहे.एकतर सदर दवाखाना हा वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमण करून बांधला आहे आणि त्याची ग्रामपंचायत दप्तरी कुठेही नोंद नसल्याचे ग्रामपंचायत कार्यालयाने लेखी उत्तर दिले आहे. सदर दवाखान्यास अधिकृत वीज जोडणी नसावी आणि जर ती असेल तर ती बेकायदेशीर आहे असे बचाव समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याच्या वीज चोरी बाबत तक्रार करूनही विद्युत मंडळ काहीच कार्यवाही करत नसेल तर विद्युत मंडळाकडून या दवाखान्याला अभय मिळाले आहे का ? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. जर दवाखान्याच्या वीज चोरी विरोधात लवकरात लवकर कारवाई केली नाही तर विद्युत मंडळाच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचे अध्यक्ष व बोरीपार्धी ग्रामपंचायतचे सदस्य अशोक अडसूळ यांनी सांगितले.

  • अशोक अडसूळ

    ​मी अशोक भागुजी अडसूळ, 'सत्यप्रकाश न्यूज'चा मुख्य संपादक. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे आणि समाजाचे प्रश्न मांडणे हे माझे ध्येय आहे. आमच्या पोर्टलची मूळ मूल्ये म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा होय. पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी आम्ही प्रसिद्ध करत नाही. आपल्या परिसरातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि समाजोपयोगी बातम्या वाचण्यासाठी आमच्याशी जोडून राहा.आमच्या या प्रवासात आपणही सहभागी व्हा. आपल्या भागातील बातम्या किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला 9561708090 या क्रमांकावर संपर्क करा.

    Related Posts

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    दापोडी : संदिप चव्हाणनुकतीच दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक पार पडली त्यामध्ये विजय हनुमंत भांडवलकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.सदर निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत…

    Continue reading
    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    बोरीपार्धी :- अशोक अडसूळबोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून व खोटी कागदपत्र सादर करून उभारलेल्या बेकायदेशीर दवाखान्यावर कारवाई कधी होणार ? तक्रार करून दोन महीने उलटून गेले पण अजुनही…

    Continue reading

    हे नक्की वाचा

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

    लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !