विटगन कंपनीच्या वतिने वारकऱ्यांना किट वाटप करताना कंपनीचे प्रतिनिधी व मान्यवर.
भांडगाव :-
पंढरीच्या विठ्ठल नामाचा गजर करत निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्यासाठी भांडगाव येथील सुप्रसिद्ध वीटगन इंडिया प्रा.ली.कंपनीने एक सामाजिक बांधिलकी जपत अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना प्रवासासाठी उपयुक्त अशा बॅग्स आणि नित्यउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.उन,वारा,पावसाचा त्रास सहन करत हजारो वारकरी पायी वारी करत विठ्ठलाच्या भेटीला जात असतात. त्यांच्या या कष्टाच्या प्रवासात त्यांना थोडा दिलासा मिळावा आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने वीटगन इंडिया कंपनी भांडगाव यांनी पुढाकार घेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सदर किटचे वाटप केले.या किटमध्ये एक वॉटरप्रूफ बॅग ज्यामध्ये वारक-यांना साहित्य ठेवून ती बॅग पाठीवर घेता येईल अशी व्यवस्था,त्यामध्ये स्टिलची पाणी बोटल,कोलगेट-ब्रश,बँडेज पट्टी, सॅनिटायझर,वारकरी उपरणे इत्यादी प्रवासासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.


याप्रसंगी कंपनीच्या व्यवस्थापनाकडून वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. “वारकऱ्यांची सेवा करणे हे आमच्यासाठी भाग्य आहे आणि त्यांच्या प्रवासातील अडचणी काही प्रमाणात कमी करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे,” अशी भावना कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
वीटगन कंपनीच्या या सामाजिक कार्याबद्दल परिसरातील नागरिक आणि वारकरी संप्रदायाकडून कंपनीच्या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडी भांडगाव येथे आली असता कंपनीच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी दिंडीतील वारकऱ्यांना किटचे वाटप केले.त्यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडीचे अध्यक्ष मल्हारीदादा सोडनवर यांनी विटगन इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकांचे आभार मानले व दिंडीच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास यावेळी कंपनीचे कर्मचारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यामध्ये कंपनीचे प्रतिनिधी पांडुरंग चोरमले,प्रितम दोरगे,अमोल लोखंडे,बाळासाहेब गरड,लक्ष्मण चौधरी तसेच खोपोडी वि.का.सोसायटीचे संचालक आबा चोरमले,साई आशिर्वाद ट्रॅव्हल्सचे संचालक बंडूशेठ नेवसे,विशालशेठ चव्हाण ,बजाज शोरूम चौफुलाचे मालक अनिलशेठ गडधे,हाॅटेल साईराजचे मालक भारत घुले,आकांक्षा ईलेक्ट्राॅनिकचे मालक निलेशशेठ ताडगे,मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख,पुरोगामी संघर्ष परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेश पवार ,संजय पांढरे,नानासाहेब हाके,गणेश पांढरे,मारूती महाडीक,शरद खैरे,गोरख मांडगे,अनिल नेवसे,तळेकर गुरूजी,आनंदा पठारे,बाळासाहेब हाके,भुषण मराठे,संदिप सोडनवर,आप्पा गायकवाड,संतोष सोडनवर,मनीराम चौधरी व दिंडीचे सर्व संचालक उपस्थित होते.





