वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करताना डॉ. प्रसाद खताळ, डॉ. अनिकेत शेळके व पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सदस्य रोहिदास राजपुरे.
इंदापूर :-
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी एका विशेष आरोग्य सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे पालखी मार्गावरील हडपसर,चौफुला,वरवंड,बारामती, सणसर आणी इंदापूर या ठिकाणी भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण करण्यात आले. “वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून राबवलेल्या या मोहिमेमुळे हजारो भाविकांना या सेवेचा लाभ मिळाला.

वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करताना डॉ. श्रीवल्लभ अवचट केडगाव.
आरोग्य सेवेच्या या उपक्रमात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवला.या सेवाभावी उपक्रमात नामांकित डॉक्टरांच्या उपस्थितीत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.डॉ. प्रसाद खताळ, डॉ. अनिकेत शेळके, डॉ. श्रीवल्लभ अवचट, डॉ.विक्रम वाघमोडे,डाॅ.वैभव भोसले यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच, या कार्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
डॉ. अवचट हे हडपसर ते इंदापूर पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी अनेक वर्षांपासून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडी सोहळ्यातील व इतर दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोचार करत असतात. पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सदस्य रोहिदास राजपुरे यांच्या सहकार्यातून दौंड तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधाचे वाटप करण्यात येत असते. तसेच परिसरातील इतरही नामांकित डॉक्टर या उपक्रमात सहभागी होत असतात.


वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करताना डाॅ.विक्रम वाघमोडे पाटील व औषध वाटप करताना दौंड तालुका केमिस्ट असो. सदस्य.
या उपक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सदस्य रोहिदास राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.यामधे दौंड तालुका केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी विशाल शेळके, गणेश कुल,योगेश रणदीवे,CAPD चे संघटक सचिव गणेश ठोंबरे,इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशन उपाध्यक्ष अकबर तांबोळी,अर्चना राजपुरे (संचालिका, शौर्य हॉलिडेज), प्रकाश राऊत, रेश्मा चोरमले (महिला संचालिका, CAPD) यांच्यासह परशुराम चोरमले, दत्तात्रय बारवकर, अभिषेक गोफणे, सुजाता बारवकर, आनंद टेळे, शीतल टेळे, संदीप खरात आणि रेखा खरात यांनी मोलाचे सहकार्य केले. असोसिएशनच्या सर्वच सभासदांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन औषध वाटपाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.

वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करताना डॉ. वैभव भोसले इंदापूर.
यावेळी,अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष तुषार शेळके,मराठा महासंघाचे दौंड तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख,अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्हारी सोडनवर,उपाध्यक्ष माऊली ठोंबरे,कार्याध्यक्ष चिमाजी नरूटे,सचिव हरिभाऊ हंडाळ,खजिनदार चंद्रकांत गडदरे,संचालक अनिल गडधे,सुनिल माने,शिवाजी खडके,संभाजी नरूटे,सतिश हंडाळ,ज्ञानदेव मेमाने,दिनकर म.देवडकर,सुरेश टेंगले,सुनिल जांभळकर,केशव टुले,महादेव म.गरदडे,निलेश ताडगे,संतोष सोडनवर ,संदिप सोडनवर,भुषण मराठे,प्रतिक अडसुळ,विठ्ठल मासाळ,बाळासाहेब गोडगे,मल्हारी सुळ,गणेश पांढरे,प्रदिप नेवसे,अभिजित अडागळे,बबन नरूटे,हरिदास मेहर,विणेकरी गावडे,पुणे जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषद अध्यक्ष सुरेश पवार,बाळासाहेब वाघमोडे संचालक छत्रपती सह.सा.का.भवानीनगर,विठ्ठल वाघमोडे,सुनिल काळे आदि मान्यवर उपस्थित होते.





