गोसेवेचा बुरखा फाटला ! एका बाजुला गोसेवेचा आव आणी दुसऱ्या बाजुला गोवंशाचा छळ !

गोसंवर्धन’ या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला जातो, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर चित्र अत्यंत भयानक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.दौड तालुक्यातील बोरीपार्धी येथील बोरमलनाथ गोशाळा ट्रस्टच्या गोशाळेत अन्नपाण्या वाचून जनावरांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले असून मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यास टाळाटाळ केल्याचे दिसत आहे.

केडगाव :- अशोक अडसूळ
बोरीपार्धी येथे बोरमलनाथ मंदिर परिसरात वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून बोरमलनाथ मंदिरचे पुजारी कैलास गुरव हे बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट या नावाने एक गोशाळा चालवत आहे.या ट्रस्ट मध्ये कैलास एकनाथ शेलार, सोनाली बापूराव ताडगे,व शुभम कैलास शेलार हे तिन सदस्य असून सदर गोशाळेची मंजुरी घेताना बोरमलनाथ देवस्थान जमिन गट नंबर १४४ ची कागदपत्र जोडून मंजुरी घेतली असल्याचे समोर आले आहे.परंतू प्रत्यक्षात मात्र सदरची गोशाळा ही अतिक्रमण करून वनविभागाच्या जागेवर गट नंबर २३३/७ अ,मध्ये चालवत आहे. तसे महसूल व वन विभागाच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. मंजुरी घेताना एका जागेत आणी बांधकामे मात्र वनविभागाच्या जागेत करून वनविभागाची जागा हडपली आहे.बोरमलनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास गुरव यांची अशी अनेक प्रकरणे ग्रामस्थांनी उघडकीस आणली आहेत.

बोरमलनाथ देवस्थान बचाव समीतीच्या सदस्यांना माहीती मिळाली की,बोरमलनाथ गोशाळेत दोन तिन दिवसांपासून एक वासरू मरून पडले आहे.त्यामुळे गुरूवार दिनांक-२४.६.२०२६ रोजी दुपारी बोरमलनाथ देवस्थान बचाव समीतीच्या काही सदस्यांनी व ग्रामस्थांनी गोशाळेला भेट देऊन पहाणी केली असता एक गाईचे वासरू अंदाजे तिन ते चार दिवसांपूर्वी मरून पडले असल्याचे दिसले.वासराचे शरीर संपूर्णतः कडक झाल्याचे दिसून आले.सदर वासराचे डोळो कावळ्यांनी चोच्या मारून फोडून खाल्ले होते.शरिरावर अनेक ठिकाणी जखमा दिसून आल्या,परिसरात भटकत्या कुत्र्यांचा वावर होता आणी गोशाळेत जनावरांच्या देखभालीसाठी कोणीही नसल्याचे दिसून आले.तसेच इतरही जनावरे चारा पाण्यासाठी हंबरडा फोडत असल्याचे पाहिले.गोशाळेच्या परिसरात पहाणी केली असता जनावरांच्या समोर खाण्यासाठी एक चिपाडही दिसले नाही आणी पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हते.गोशाळेची अशी भयान परिस्थिती पाहून समीतीच्या सदस्यांनी केडगावच्या पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.चैत्राली आव्हाड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून झालेली घटना सांगीतली व जागेवर येऊन पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली.डाॅ.चैत्राली आव्हाड या थोड्याच वेळात गोशाळे मध्ये आल्या आणि त्यांनी जे दृश्य पाहिले ते धक्कादायक होते.त्यांनी तेथील व्यवस्थापक रमेश गुरव यांना सदर कालवडीवर औषधोपचार का केला नाही ? अशी विचारणा केली असता व्यवस्थापकांनी सांगितले की सदर कालवडीवर डॉक्टर लकडे यांनी औषधोपचार केला आहे.तेव्हा डाॅ.आव्हाड यांनी डाॅ.लकडे यांना फोन करून विचारले असता त्यांनी मी कोणत्याही कालवडीवर औषधोपचार केला नसल्याचे सांगीतले.त्यावेळी रमेश गुरव याने ग्रामस्थांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला.


सदर बाबत ग्रामस्थांनी डॉक्टर चैत्राली आव्हाड यांना प्राण्यांचा छळ करणे, त्यांची विल्हेवाट न लावणे, त्यांना अन्नपाण्या वाचून उपाशी ठेवणे,औषधोपचारा पासून वंचित ठेवणे,त्यांची सुरक्षितता धोक्यात आणने ई.गोष्टींसाठी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अन्वये विवीध कलमाखाली बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट च्या सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चैत्राली आव्हाड यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली परंतु त्या सुरुवातीला टाळाटाळ करत होत्या त्यांना जेव्हा सांगण्यात आले की,सदर ठिकाणी पत्रकार येत आहेत,एक टिम महाराष्ट्र गोसेवा आयोगात बसुन आहे,एक टिम पंचायत समितीत बसुन आहे तुम्ही जर योग्य कार्यवाही केली नाही तर आम्ही तुमच्या विरूद्ध वरिष्ठांकडे तक्रार करू तेव्हा त्यांनी मी जागेवर येते तुम्ही तिथेच थांबा असे सांगीतले.कही वेळातच डाॅक्टर येण्या आगोदर सदर ठिकाणी रमेश शेलार हे एक जेसीबी मशीन घेऊन आले व सदर मृत वासराची विल्हेवाट लावण्याची तयारी करू लागले तेव्हा ग्रामस्थांनी त्यास विरोध करून डाॅक्टर येई पर्यंत काहीच करू नका असे सांगीतले.इथे मात्र शंका निर्माण झाली की,गेली तिन ते चार दिवस गाईचे वासरू मरून पडले होते तेव्हा त्याची विल्हेवाट का लावली नाही. जेव्हा ग्रामस्थांनी ही बाब पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा मात्र तत्परतेने लगेच जेसीबी मशीन येते आणी विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करते.कदाचित डाॅक्टरांनीच गोशाळा मालकाला मी येण्या अगोदर सदर वासराची विल्हेवाट लावा असे सांगितले असल्याची शंका ग्रामस्थांना निर्माण झाली.

मागील आठवड्यात गोशाळेतील दोन-तीन गाई आजारी असल्याबाबत व जनावरे चारापाण्यावाचून ओरडत असलेबाबत तालुक्यातिल एका प्रतिष्ठित व्यक्तीने फोन करून डाॅ आव्हाड यांना कळविले असता त्यांनी याबाबत मला गोशाळा मालकाने कळवायला पाहीजे तरच मी सदर ठिकाणी येईल असे उत्तर दिले व त्या आजारी गाई औषधोपचार न मिळाल्याने मृत पावल्याचे ग्रामस्थांकडून समजत आहे.यापुर्वी देखील दिनांक- २३.९.२०२५ रोजी पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.चैत्राली आव्हाड यांच्याकडे लेखी तक्रार करून सदर गोशाळेत जनावरांचा छळ होत असुन औषध व अन्नपाण्यावाचून जनावरे मरत आहेत त्याबाबत सबळ पुरावे देऊन सुद्धा त्यांनी कोणतीच कारवाई केली नव्हती असे ग्रामस्थांनी सांगितले.त्यामुळे ग्रामस्थांनी गोशाळा आयोगाकडे तक्रार करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. गोसेवा आयोगाने त्रिसदस्यीय समितीची निर्मिती करून चौकशीचे आदेश दिले त्या समितीमध्ये डॉ. चैत्राली आव्हाड यांचा देखील समावेश करण्यात आला होता. चौकशी अहवालात समितीने गोशाळेच्या अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत.

१) सदर गोशाळेत जनावरांना दिलेल्या चाऱ्याची नोंदवही नाही.
२) गोशाळेत गाईंना खुराक दिल्याचे दिसून येत नाही.
३) जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हौद अस्वच्छ असून त्यामध्ये शेवाळ वाढलेले दिसत आहे.
४) गोठ्यात स्वच्छता नसल्यामुळे जनावरे उभी असल्याचे दिसून आले.
५) गोशाळेकडे उपलब्ध औषधसाठा व दैनंदिन औषध वापर नोंदवही उपलब्ध नसून केस पेपरची मागणी केली असता ते उपलब्ध नाही.
६) मृत जनावरांची नोंदवही उपलब्ध नसुन पंचनामे केल्याचे व मृत जनावरांचे फोटो उपलब्ध नाहीत.
७) पशुधनसाठा नोंदवही,जन्मलेल्या वासरांची नोंदवही,विकलेल्या अथवा दान केलेल्या जनावरांची नोंदवही,मेलेल्या जनावरांची
नोंदवही,शवविच्छेदन नोंदवही यापैकी एकही नोंदवही सादर करण्यात आली नाही.
८) आवक व जावक जनावरांचा हिशोब व प्रत्यक्ष असलेली जनावरे यांचा ताळमेळ लागत नाही.


एकंदरीत तपासणी वेळेस असे दिसून आले की, गोशाळेत उपलब्ध असलेल्या पशुधनास देत असलेला चारा हा कमी पोषणद्रव्य असलेला दिला जात असून तो आवश्यक गरजेपेक्षा कमी प्रमाणात दिला जात आहे.त्यामुळे बरीच जनावरे अशक्त दिसून येत आहेत व काही जनावरे कुपोषित दिसून येत आहे. तसेच सर्वसाधारणपणे देखभाल व्यवस्थापन कमकुवत असल्याचे दिसून येत आहे.असा अहवाल त्रिसदस्यीय समीतीने गोशाळा आयोगास सादर केला आहे.


गोशाळेची अशी भयानक परिस्थिती असताना खुद्द पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चैत्राली आव्हाड यांनीच हा अहवाल तयार करून महाराष्ट्र गोसेवा आयोगाला दिला असताना चालू वर्षी २०२६ मध्ये सदर गोशाळा अतिशय योग्य पद्धतीने काम करत आहे असा अहवाल गोशाळा आयोगाला देऊन गोशाळेला अनुदान प्राप्त करून दिल्याचे समोर आले आहे.त्यामुळे डाॅ.चैत्राली आव्हाड यांची भुमिका संशयास्पद असल्याची चर्चा ग्रामस्थांमधे रंगू लागली आहे.

सदर बाबत आमचे प्रतिनिधी यांनी डाॅ.आव्हाड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर गोशाळा चालकांना वारंवार तोंडी अथवा लेखी कळवून तुम्ही जनावरांचा व्यवस्थीत सांभाळ करा,त्यांना वेळेवर औषधोपचार व अन्न पाणी द्या,तरी देखील गोशाळा चालक वारंवार अशा चुका करत आहे. त्याबाबत मी माझ्या वरिष्ठांना कळविले आहे.तसेच मी स्वत: गोशाळा चालक यांना फोन करून मृत वासराबाबत मला का कळविले नाही अशी विचारना करून तुम्ही समक्ष हजर रहा असे कळविले होते. परंतू मी त्यांना विल्हेवाट लावा असे सांगीतले नव्हते.बोरमलनाथ देवस्थान बचाव समीतिने केलेल्या अर्जाबाबत मी वरिष्ठांना कळविले होते तसे केलेले पत्रव्यवहार माझ्याकडे आहेत.सदर बाबत मी योग्य ती कार्यवाही करत आहे.मी बोरमलनाथ गोशाळेच्या जनावरांची अनेक वेळा जाऊन तपासणी केली परंतू त्यांच्याकडून कधीच फी घेतली नाही.बोरमलनाथ बचाव समितीचा व ग्रामस्थांचा माझ्याविषयी काहीतरी गैरसमज होत असल्याचे त्यांनी सांगीतले.


सदर गोशाळेच्या ट्रस्टींवर यापूर्वीच महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून योग्य ती कारवाई होणे अपेक्षित होते परंतु तशी कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामस्थांनी या विषयी गोशाळेतील सर्व भोंगळ कारभार आयोगाच्या लक्षात आणून दिला आहे.आता केडगावच्या पशुवैद्यकीय अधिकारी चैत्राली आव्हाड व गोशाळा आयोग काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

  • अशोक अडसूळ ( मुख्य संपादक )

    ​मी अशोक भागुजी अडसूळ, 'सत्यप्रकाश न्यूज'चा मुख्य संपादक. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे आणि समाजाचे प्रश्न मांडणे हे माझे ध्येय आहे. आमच्या पोर्टलची मूळ मूल्ये म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा होय. पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी आम्ही प्रसिद्ध करत नाही. आपल्या परिसरातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि समाजोपयोगी बातम्या वाचण्यासाठी आमच्याशी जोडून राहा.आमच्या या प्रवासात आपणही सहभागी व्हा. आपल्या भागातील बातम्या किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला 9561708090 या क्रमांकावर संपर्क करा.

    Related Posts

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    ग्रामपंचायतने वाटप केलेल्या टपरीतच मटका जुगारीचा अड्डा. बोरीपार्धी :-बोरीपार्धी गावचे हद्दीत केडगाव स्टेशन उड्डाण पूला खाली मारूती मंदिरा जवळ एका टपरीमध्ये राजरोसपणे मटका जुगारीचा खेळ खेळला जात आहे.सदर जुगारीमुळे तरूण…

    Continue reading
    डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले !

    मान्यवरांच्या हस्ते “आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार” स्वीकारताना डॉ. उमेश कणकवलीकर. पुणे :-​शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी पुणे येथील ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ येथे एका विशेष सोहळ्यात डॉ. उमेश…

    Continue reading

    हे नक्की वाचा

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले !

    डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले !

    विटगन इंडिया प्रा. लि.कंपनीने वारकऱ्यांसाठी नित्यउपयोगी वस्तूंच्या किट वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी !

    विटगन इंडिया प्रा. लि.कंपनीने वारकऱ्यांसाठी नित्यउपयोगी वस्तूंच्या किट वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी !

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; मोफत औषधांचे वाटप !

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; मोफत औषधांचे वाटप !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

    दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !