प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारणार :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातूनएकत्रित कार्यपद्धती कार्यरत.

मुंबई :- राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. अमली पदार्थ व्यापार व सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्यातील अमली पदार्थ विक्री व सेवनासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सदस्य सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, अमीन पटेल, योगेश सागर आणि संजय क्षीरसागर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि सेवन हे केवळ महाराष्ट्रासमोरील नव्हे तर संपूर्ण देशासमोरील गंभीर आव्हान आहे. केंद्र शासनाने देशव्यापी अमली पदार्थविरोधी मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत राज्य शासनाने ‘Whole of Government Approach’ विकसित केला आहे. गृह विभागाच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये समन्वय साधून अवैध अमली पदार्थांची शेती, लागवड, उत्पादन, व्यापार, वाहतूक, विक्री आणि सेवन यांवर नियंत्रण आणण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अमली पदार्थांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाद्वारेही जनजागृती करण्यात येत आहे. तसेच अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यात (NDPS Act) सुधारणा करण्याबाबत केंद्र शासनाला राज्य शासनाने सूचना पाठविल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

राज्य शासनाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार NDPS कायद्यांतर्गत दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, अमली पदार्थविरोधी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बढती, प्रोत्साहनपर लाभ आणि विशेष नियुक्ती देण्यात येणार आहे. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्समध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर इच्छेनुसार बदलीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबई पोलिसांनी गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांत जाऊन यशस्वी कारवाया केल्या आहेत. २०२५ मध्ये अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स आणि पोलीस यंत्रणेमार्फत तब्बल ५२३.१७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी १,१४२ गुन्हे दाखल करण्यात आले असून १,६२६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २५४.५३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच अमली पदार्थ सेवनाविरोधात ३,१९९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मे २०२६ अखेर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात ५२८ गुन्हे दाखल करून ६५५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सेवन करणाऱ्या २,८५५ जणांविरोधात गुन्हे दाखल करून २,४५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

उपप्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपी सलीम डोला याला परदेशातून अटक करून भारतात आणण्यात आले असून अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई सुरू आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ जाळून पूर्णतः नष्ट करण्यात येतात, त्यामुळे तो माल पुन्हा बाजारात येण्याची शक्यता राहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची सात युनिट्स कार्यरत असून नव्याने पदनिर्मिती करून त्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. तसेच अमली पदार्थांबाबत माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना बक्षीस देण्याची योजनाही राबविण्यात येणार आहे. मुंबई आणि परिसरातील व्यसनाधीन रुग्णांच्या पुनर्वसनासाठी विशेष केंद्रे उभारण्याकरिता जमीन उपलब्ध करून देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जाणार आहेत. याशिवाय आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चित्रपट आणि इतर माध्यमांमधून होणाऱ्या अमली पदार्थांच्या उदात्तीकरणाबाबतही शासन गंभीर असून त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • अशोक अडसूळ

    ​मी अशोक भागुजी अडसूळ, 'सत्यप्रकाश न्यूज'चा मुख्य संपादक. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे आणि समाजाचे प्रश्न मांडणे हे माझे ध्येय आहे. आमच्या पोर्टलची मूळ मूल्ये म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा होय. पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी आम्ही प्रसिद्ध करत नाही. आपल्या परिसरातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि समाजोपयोगी बातम्या वाचण्यासाठी आमच्याशी जोडून राहा.आमच्या या प्रवासात आपणही सहभागी व्हा. आपल्या भागातील बातम्या किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला 9561708090 या क्रमांकावर संपर्क करा.

    Related Posts

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    पिंपळे गुरव :-दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रारंभ तसेच शाळेच्या नवीन बुद्धविहार इमारतीचा पायाभरणी समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमास शाळेचे स्थानिक अध्यक्ष…

    Continue reading
    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वरवंड :- जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या १३ जुलै रोजी वरवंड मुक्कामी येत आहे. सदर सोहळ्यासाठी महाराष्ट शासन व वरवंड ग्रामपंचायतच्या वतीने…

    Continue reading

    हे नक्की वाचा

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

    लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !