धक्कादायक बातमी :- जागा वनविभागाची, कागदपत्रे दुसरीकडची; बोरीपार्धी येथील ‘नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याचा’ अजब कारभार उघड !

बोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेतील नाथसखा आयुर्वेदिक दवाखाना.

केडगाव :- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वनविभागाच्या शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये ‘नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालय एवं पंचकर्म केंद्र’ धडधडीतपणे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या दवाखान्याची शासकीय परवानगी मिळवण्यासाठी चालकांनी दुसऱ्याच ठिकाणची बोगस किंवा बनावट कागदपत्रे जोडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

​नेमका काय आहे प्रकार ?
​मिळालेल्या माहितीनुसार, बोरीपार्धी (चौफुला) येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात एक तीन मजली टोलेजंग इमारत उभी आहे. ही इमारत वनविभागाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आली असुन याच अतिक्रमित इमारतीमध्ये ‘नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालय’ राजरोसपणे चालवले जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

​कागदपत्रांची हेराफेरी आणि प्रशासनाची दिशाभूल :-
​कोणताही दवाखाना किंवा वैद्यकीय केंद्र सुरू करण्यासाठी आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाची रीतसर परवानगी आवश्यक असते आणी तशी बाॅम्बे नर्सिंग होम ॲक्ट प्रमाणे १५ खाटांची परवानगी नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याच्या चालकांनी मिळवली आहे.मात्र, हे चिकित्सालय वनविभागाच्या वादग्रस्त आणि अतिक्रमित जागेत असल्याने, तेथील परवानगी मिळणे अशक्य होते. यावर तोडगा म्हणून दवाखान्याच्या चालकांनी प्रशासनाची दिशाभूल करत धायगुडेवाडी येथील बोरमलनाथ देवस्थानच्या खाते क्र.१०३३ जमीन गट नंबर १४४ चे सातबारा आठ ‘अ’ उतारे, ग्रामपंचायत बोरीपार्धी यांचा ‘नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालय’ या नावाने व्यवसाय करण्यासाठीचा (ना हरकत प्रमाणपत्र) व्यवसाय दाखला,बोरमलनाथ देवस्थान इनाम जमिन गट नंबर १४४ क्षेत्र १४ हे.४० आर पैकी ०० हे.०१.२१ आर (१३०४ चौ.फुट) मिळकत बोरमलनाथ देवस्थानचे ट्रस्टी कैलास एकनाथ शेलार यांनी दवाखान्याचे चालक निलेश कैलास शेलार यांना दरमहा ५००० रू.भाडेपट्टीवर दहा वर्षांसाठी दिल्याचा करारनामा,आर्किटेक्चरल प्लॅन (नकाशा), सिव्हिल इंजिनिअर चे (कंपलेशन सर्टिफिकेट) बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला.
ही दुसरीकडची कागदपत्रे आणि पुरावे सादर करून दवाखान्याची परवानगी लाटल्याची माहिती समोर येत आहे.

  • अशोक अडसूळ

    ​मी अशोक भागुजी अडसूळ, 'सत्यप्रकाश न्यूज'चा मुख्य संपादक. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे आणि समाजाचे प्रश्न मांडणे हे माझे ध्येय आहे. आमच्या पोर्टलची मूळ मूल्ये म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा होय. पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी आम्ही प्रसिद्ध करत नाही. आपल्या परिसरातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि समाजोपयोगी बातम्या वाचण्यासाठी आमच्याशी जोडून राहा.आमच्या या प्रवासात आपणही सहभागी व्हा. आपल्या भागातील बातम्या किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला 9561708090 या क्रमांकावर संपर्क करा.

    Related Posts

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    दापोडी : संदिप चव्हाणनुकतीच दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक पार पडली त्यामध्ये विजय हनुमंत भांडवलकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.सदर निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत…

    Continue reading
    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    बोरीपार्धी :- अशोक अडसूळबोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून व खोटी कागदपत्र सादर करून उभारलेल्या बेकायदेशीर दवाखान्यावर कारवाई कधी होणार ? तक्रार करून दोन महीने उलटून गेले पण अजुनही…

    Continue reading

    हे नक्की वाचा

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

    लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !