सत्यप्रकाश न्यूज प्रतिनिधी :- अशोक अडसूळ
भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा’रेड अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्याच्या घाट परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून, संभाव्य धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना (जिल्हा परिषद, नगरपालिका, आश्रमशाळा, खासगी, अनुदानित व विनाअनुदानित, इंग्लिश मीडियम शाळा आणि सर्व अंगणवाडी) सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत.शिक्षकांसाठी सूचना:शाळांना सुट्टी असली तरी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन सतर्क राहावे आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






