धक्कादायक ! वनविभागाच्या जागेवर उभारला चक्क दवाखाना.

कोणाच्या आशीर्वादाने वनजमिनीवर दवाखाना ? अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. ग्रामस्थांनी केली प्रशासनाकडे कारवाईची मागणी.आरोग्य विभागाच्या कारवाईकडे लक्ष.

केडगाव- मौजे बोरीपार्धी,ता.दौंड,जि.पुणे येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात वनविभागाची गट नंबर २३३ (१)अ,२३३(६)अ,२३३(७) अ मधे जवळपास शंभर एकर जमीन आहे.वास्तविक पहाता केडगाव बोरीपार्धी परीसर हा अत्यंत झपाट्याने शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.सदर जमीन ही अत्यंत मोक्याची असुन करोडो रूपये तिची किंमत आहे.जर या जमिनींचे संरक्षण केले नाही तर भविष्यात अतिक्रमण होऊन शासनाकडे एखादे सार्वजनिक काम करण्यासाठी जागाच राहणार नाही तसेच अतिक्रमण झाल्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होईल व त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊन समाज जिवन विस्कळीत होऊन जाईल. त्यामुळे वनविभागाने त्यांच्या जमीनीवर कोणी अतिक्रमण करणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

परंतू बोरीपार्धीतील ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाकडे तक्रार करूनही वनविभागाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही.विशेष म्हणजे वन विभाग एखाद्या शेतकऱ्याने गवताची काडी जरी उचलली तरी त्याच्यावर कारवाई करते.इथे मात्र वेगळीच गोष्ट आहे.राजरोसपणे दिवसा ढवळ्या तिन तिन मजली आर.सी.सी.बांधकाम करून इमारत बांधली जाते पण वनविभाग मात्र बघ्याची भुमिका घेते या मागे काय गौडबंगाल आहे ? कोणाच्या आशीर्वादाने बेकायदेशीर कामे वनविभागाच्या जागेत सुरू आहेत ? वन विभाग बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणार का ?असे अनेक प्रश्न ग्रामस्थांना पडले आहेत.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचे अश्वासन दिले असून लवकरच ती जागा ताब्यात घेणार असल्याचे सांगीतले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अतिक्रमण करून उभारलेल्या इमारतीत नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालय एवं पंचकर्म केंद्र राजरोस पणे सुरू आहे.बोरमलनाथ देवस्थान बचाव समितने त्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी पुणे तसेच तालुका आरोग्य अधिकारी दौंड व मुख्य वनसंरक्षक पुणे यांच्याकडे लेखी तक्रार करून सदर दवाखाना बोगस आहे का ? वनविभागाच्या जागेत दवाखाना सुरू करताना परवानगी घेतली आहे का ? घेतली असेल तर परवानगी कोणी दिली ?सदर दवाखान्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे का ? ग्रामपंचायतने नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे का ? याची सखोल चौकशी करून बेकायदेशीर दवाखाना चालवणारावर तात्काळ कारवाई करून सदरचे अतिक्रमण निष्कासित करून ती जागा वनविभागाने ताब्यात घ्यावी अशी मागणी केली आहे.जर लवकरात लवकर सदर बाबत कार्यवाही केली नाही तर अमरन उपोषण करण्याचा इशारा बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीच्या सदस्यांनी दिला आहे.आता आरोग्य अधिकारी व वनविभाग काय कारवाई करते हे पहाणे औत्सुक्याचे राहील.

  • अशोक अडसूळ ( मुख्य संपादक )

    ​मी अशोक भागुजी अडसूळ, 'सत्यप्रकाश न्यूज'चा मुख्य संपादक. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे आणि समाजाचे प्रश्न मांडणे हे माझे ध्येय आहे. आमच्या पोर्टलची मूळ मूल्ये म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा होय. पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी आम्ही प्रसिद्ध करत नाही. आपल्या परिसरातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि समाजोपयोगी बातम्या वाचण्यासाठी आमच्याशी जोडून राहा.आमच्या या प्रवासात आपणही सहभागी व्हा. आपल्या भागातील बातम्या किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला 9561708090 या क्रमांकावर संपर्क करा.

    Related Posts

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    ग्रामपंचायतने वाटप केलेल्या टपरीतच मटका जुगारीचा अड्डा. बोरीपार्धी :-बोरीपार्धी गावचे हद्दीत केडगाव स्टेशन उड्डाण पूला खाली मारूती मंदिरा जवळ एका टपरीमध्ये राजरोसपणे मटका जुगारीचा खेळ खेळला जात आहे.सदर जुगारीमुळे तरूण…

    Continue reading
    गोसेवेचा बुरखा फाटला ! एका बाजुला गोसेवेचा आव आणी दुसऱ्या बाजुला गोवंशाचा छळ !

    पुन्हा एकदा गोशाळा चालकांचा भोंगळ कारभार ग्रामस्थांनी आणला चव्हाट्यावर. गोसंवर्धन’ या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला जातो, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर चित्र अत्यंत भयानक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.दौड…

    Continue reading

    हे नक्की वाचा

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले !

    डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले !

    विटगन इंडिया प्रा. लि.कंपनीने वारकऱ्यांसाठी नित्यउपयोगी वस्तूंच्या किट वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी !

    विटगन इंडिया प्रा. लि.कंपनीने वारकऱ्यांसाठी नित्यउपयोगी वस्तूंच्या किट वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी !

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; मोफत औषधांचे वाटप !

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; मोफत औषधांचे वाटप !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !