जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
वरवंड :- जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या १३ जुलै रोजी वरवंड मुक्कामी येत आहे. सदर सोहळ्यासाठी महाराष्ट शासन व वरवंड ग्रामपंचायतच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.उद्या दुपारी पालखी चौफुला येथे विसाव्यासाठी थांबनार आसून विसावा ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला असून हिरकणी कक्षाची देखील उभारणी करण्यात आली आहे व हिरकणी कक्षात मदतीसाठी अंगनवाडी सेवीकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वारक-यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असुन भाविकांना दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली असल्याचे बोरीपार्धी ग्रामविकास अधिकारी मुरलीधर बडे यांनी सांगीतले.

वरवंड येथे वारकऱ्यांसाठी अनेक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये दोन मंडप (जर्मन हँगर) देण्यात आले आहेत.एक मंडप पालखी तळावर व दुसरा बाजार तळावर देण्यात आला आहे. सदर मंडपा मध्ये हिरकणी कक्ष, वारकऱ्यांसाठी चरण सेवा, आरोग्य सेवा, इत्यादी प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.स्वच्छतेच्या दृष्टिने वारकऱ्यांसाठी १२०० शौचालय युनिट उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पालखी वरवंड मुक्कामी येत असल्यामुळे परिसरातील भाविक भक्तांची दर्शनासाठी खुप गर्दी होत असते त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिने मुख्य चौकात तसेच पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.नागरिकांनी दर्शनाला येताना मौल्यवान चिजवस्तू सोबत आणू नये तसेच आपल्या चिज वस्तू व्यवस्थीत सांभाळून ठेवण्याचे अवाहन पोलिस दलाच्या वतिने करण्यात आले आहे.

गावातील सर्वच पाण्याच्या ठिकाणी जलशुद्धीकरण करण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे.तसेच ठिकठिकाणी ओल्या व सुक्या कच-यासाठी कचराकुंड्या तयार करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर सोहळ्यासाठी महाराष्ट शासनाच्या वतीने जिल्हाअधिकारी पुणे,दौंडचे आमदार राहूल कुल,आरोग्य व पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केलेली असून वारक-यांच्या सोयीसुविधेत कुठलीच कमतरता राहणार नाही याची पुरेपुर काळजी घेण्यात आली असल्याचे वरवंड ग्रामविकास अधिकारी संदिप ओव्हाळ यांनी सांगीतले. वरवंड येथे ग्रामस्थांच्या वतीने वारक-यांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.






