बोरीपार्धी ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर; ६ प्रभागांतील जागांचे चित्र स्पष्ट

केडगाव (प्रतिनीधी) बोरीपार्धी ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची सदस्यपदांची अंतिम आरक्षण सोडत बैठक आज शुक्रवार १२ जून २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. या सोडतीमुळे गावातील ६ प्रभागांतील एकूण १७ जागांचे आरक्षण निश्‍चित झाले असून, निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आता आपापल्या प्रभागातील आरक्षणाची स्थिती स्पष्ट झाली आहे.

आरक्षणाचा संक्षिप्त तपशील (प्रभाग निहाय):- प्रभाग क्रमांक एक- एकुण जागा -३ सर्वसाधारण महिला-२,सर्वसाधारण १; प्रभाग क्रमांक दोन- एकुण जागा-३ अनुसूचित जाती महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला १,सर्वसाधारण १; प्रभाग क्रमांक तिन-एकुण जागा -३ अनुसूचित जाती १,नागरिकांचा मागास प्रवर्ग १,सर्वसाधारण महिला १; प्रभाग क्रमांक चार-एकुण जागा २,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १,सर्वसाधारण १; प्रभाग क्रमांक पाच-एकुण जागा ३,अनुसूचित जाती महिला १,अनुसूचित जमाती महिला १,सर्वसाधारण १,प्रभाग क्रमांक सहा-एकुण जागा ३,नागरिकांचा मागास प्रवर्ग १,सर्वसाधारण महिला १,सर्वसाधारण १ अशा प्रकारे बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या १७ जागांची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दौंड तालुक्यातील बोरीपार्धी ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायत सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत बोरीपार्धीचे मंडळ अधिकारी श्री. सोमशंकर बनसोडे यांनी जाहीर केली.त्यामधे एकूण १७ जागांपैकी ९ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, ४ जागा ओबीसी प्रवर्गासाठी,३ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तर १ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाली आहे.यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री. मुरलीधर बडे यांच्यासह गावातील नागरिक आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.काही ग्रामस्थांनी या सोडतीवर शंका उपस्थित केली असून काही लोकांच्या सांगण्यावरून ही सोडत काढण्यात आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. काही ग्रामस्थांनी सदर सोडतीचे विरूद्ध हरकत घेणार असल्याचे सांगीतले.एकुणच सोडतीमुळे आता कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार निवडणूक लढवू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे गावातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे.आरक्षण निश्चित झाल्याने आता निवडणुकीच्या पुढील कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Satyaprakash News

    सत्यप्रकाश न्यूज - जनसामान्यांचा विश्वास, सत्यप्रकाश. ​'सत्यप्रकाश न्यूज' हे एक अग्रगण्य मराठी न्यूज पोर्टल असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत अचूक आणि वस्तुनिष्ठ बातम्या पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. डिजिटल युगात वेगवान बातम्यांच्या गर्दीत, आम्ही सत्याची कास धरून विश्वासार्ह पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहोत. ​आम्ही काय करतो? आम्ही स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचे सखोल विश्लेषण करतो. यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश असतो: ​राजकारण: राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे निर्णय. ​गुन्हेगारी: समाजव्यवस्थेला छेद देणाऱ्या घटनांचा आढावा. ​संस्कृती आणि कला: आपल्या समृद्ध परंपरा, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे जतन. ​स्थानिक बातम्या: पुणे आणि आसपासच्या परिसरातील जनसामान्यांच्या समस्या आणि बातम्या. ​आमची मूल्ये: १. सत्यता: कोणतीही बातमी पडताळल्याशिवाय आम्ही प्रसारित करत नाही. २. पारदर्शकता: बातमीदारीमध्ये पूर्णपणे पारदर्शकता राखली जाते. ३. लोकशाही: लोकशाहीतील चौथ्या स्तंभाची जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडतो. ​आमच्या या प्रवासात तुम्हीही सहभागी व्हा. आपल्या भागातील बातम्या किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला संपर्क करा. ​ ​संपादक/मालक: श्री.अशोक भागुजी अडसुळ ​ईमेल: Satyaprakashnewspune@gmail.com ​पत्ता: मु.पो.बोरीपार्धी,ता.दौंड,जि.पुणे ​संपर्क क्रमांक: 9561708090

    Related Posts

    धक्कादायक बातमी :- जागा वनविभागाची, कागदपत्रे दुसरीकडची; बोरीपार्धी येथील ‘नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याचा’ अजब कारभार उघड !
    • June 17, 2026

    बोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेतील नाथसखा आयुर्वेदिक दवाखाना. केडगाव :- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वनविभागाच्या शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण…

    Continue reading
    बोरीपार्धीत भारत ई-सेवा केंद्राचे उद्घाटन.
    • June 16, 2026

    सुमेध एंटरप्राइजेस ई सेवा केंद्राचे उद्घाटन करताना मा.आनंद दादा काकासाहेब थोरात व ग्रामस्थ. बोरीपार्धी गावठाण येथे नुकतेच भारत ई-सेवा केंद्राचे उद्घाटन भिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद (दादा) काकासाहेब…

    Continue reading

    हे नक्की वाचा

    धक्कादायक बातमी :- जागा वनविभागाची, कागदपत्रे दुसरीकडची; बोरीपार्धी येथील ‘नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याचा’ अजब कारभार उघड !

    • June 17, 2026
    धक्कादायक बातमी :- जागा वनविभागाची, कागदपत्रे दुसरीकडची; बोरीपार्धी येथील ‘नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याचा’ अजब कारभार उघड !

    बोरीपार्धीत भारत ई-सेवा केंद्राचे उद्घाटन.

    • June 16, 2026
    बोरीपार्धीत भारत ई-सेवा केंद्राचे उद्घाटन.

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याच्या चौकशीचे आदेश.

    • June 15, 2026
    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्याच्या चौकशीचे आदेश.

    बोरीपार्धी ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर; ६ प्रभागांतील जागांचे चित्र स्पष्ट

    • June 13, 2026
    बोरीपार्धी ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर; ६ प्रभागांतील जागांचे चित्र स्पष्ट

    धक्कादायक ! वनविभागाच्या जागेवर उभारला चक्क दवाखाना.

    • June 12, 2026
    धक्कादायक ! वनविभागाच्या जागेवर उभारला चक्क दवाखाना.

    कवी हनुमंत चांदगुडे यांच्या व्याख्यानाने बालसंस्कार शिबिराची सांगता.

    • June 7, 2026
    कवी हनुमंत चांदगुडे यांच्या व्याख्यानाने बालसंस्कार शिबिराची सांगता.