महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर
लोहगाव, पुणे : – जागतिक आदिवासी दिनानिमित्त लोहगाव, पुणे येथे आदिवासी समाजाच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध उपक्रमांच्या आयोजनाने आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास श्री. अविनाश अशोक मुंढे, महाराष्ट्र प्रदेश सचिव – भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. मुंढे यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देत आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, अस्मिता, सामाजिक हक्क तसेच समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाबाबत विचारमंथन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास विशाल बांबळे, सरचिटणीस – आदिवासी आघाडी मोर्चा, पुणे जिल्हा उत्तर भाजपा, डगळे साहेब, गोतारणे साहेब तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब राखपसरे साहेब यांची उपस्थिती होती.
यावेळी कट्टर आदिवासी समाजसेवक सुनील मांडवे साहेब, सुनील मुंढे घुटे साहेब, तुकाराम मुंढे, अमोल मुंढे, राहुल मुंढे, बाळासाहेब म्हस्कर, चंद्रकांत मुंढे यांच्यासह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





