दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

बोरीपार्धी : दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा गुरुवारी दिनांक-९.७.२०२६ रोजी श्री बोरमलनाथ मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी व बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष विवेक इनामदार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामभाऊ टुले, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल हंडाळ, ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, वृक्षमित्र कृणाल नरुटे तसेच दौंड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पोपटराव फुलारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना विरधवल जगदाळे म्हणाले की, “पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजातील वास्तव सातत्याने जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. त्यामुळे लोकशाही अधिक सक्षम आणि जिवंत राहण्यास मदत होते.”सुखदेव चोरमले यांनी सांगितले की, “दौंड तालुक्यातील पत्रकार विविध सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडत असून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. पत्रकार संघाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कायम कटिबद्ध राहू.”


रामभाऊ टुले म्हणाले की, “पत्रकार समाजमनाचे प्रतिनिधित्व करतात. तालुक्यात विविध पत्रकार संघटना असल्या तरी सर्वच पत्रकार चांगले काम करत असून अधिक नेटाने आणि जबाबदारीने कार्य करण्याची गरज आहे.”राहुल हंडाळ यांनी मराठी पत्रकार संघाच्या राज्यव्यापी कार्याचा गौरव करत नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी पत्रकारितेच्या जुन्या काळातील अनुभव कथन करत मार्गदर्शन केले.वृक्षमित्र कृणाल नरुटे यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश देत पत्रकारांनी पर्यावरण जनजागृतीतही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. ॲड. पोपटराव फुलारी यांनी पत्रकारांना कायदेशीर मदतीची आवश्यकता भासल्यास दौंड बार असोसिएशनतर्फे सहकार्य करण्याची ग्वाही दिली.


यावेळी दौंड तालुका मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष संदीप शिवाजी सोनवणे, उपाध्यक्ष गौरव दिवेकर, कार्याध्यक्ष दीपक पवार, सचिव संदीप भालेराव, संघटक बाळासाहेब मुळीक, प्रसिद्धी प्रमुख राहुलकुमार अवचट, खजिनदार भाऊसाहेब ठाकूर, सहसचिव अविनाश लोंढे, कार्यकारिणी सदस्य संदीप चव्हाण, सुशांत जगताप, अंकुश काळे, धनाजी ताकवणे, नितीन गव्हाणे, राहुल बिचकुले, विठ्ठल थोरात, दत्तात्रय डाडर, सोनबा ढमे, सचिन रुपनवर,,आण्णा बारवकर अमोल शिंदे. सतीश गायकवाड आणि दीपाली दिवेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास पत्रकार, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते.

  • अशोक अडसूळ

    ​मी अशोक भागुजी अडसूळ, 'सत्यप्रकाश न्यूज'चा मुख्य संपादक. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे आणि समाजाचे प्रश्न मांडणे हे माझे ध्येय आहे. आमच्या पोर्टलची मूळ मूल्ये म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा होय. पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी आम्ही प्रसिद्ध करत नाही. आपल्या परिसरातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि समाजोपयोगी बातम्या वाचण्यासाठी आमच्याशी जोडून राहा.आमच्या या प्रवासात आपणही सहभागी व्हा. आपल्या भागातील बातम्या किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला 9561708090 या क्रमांकावर संपर्क करा.

    Related Posts

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    दापोडी : संदिप चव्हाणनुकतीच दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक पार पडली त्यामध्ये विजय हनुमंत भांडवलकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.सदर निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत…

    Continue reading
    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    बोरीपार्धी :- अशोक अडसूळबोरमलनाथ मंदिर परिसरातील वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून व खोटी कागदपत्र सादर करून उभारलेल्या बेकायदेशीर दवाखान्यावर कारवाई कधी होणार ? तक्रार करून दोन महीने उलटून गेले पण अजुनही…

    Continue reading

    हे नक्की वाचा

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    दापोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय भांडवलकर यांची बिनविरोध निवड !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    नाथसखा आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई कधी ? बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    दापोडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    बोरीपार्धीत प्रशासनाच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात लावली झाडे !

    लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

    लोहगाव, पुणे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !

    दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव ,पुणे येथे वर्षावास प्रारंभ व बुद्धविहाराच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न !