कवी हनुमंत चांदगुडे यांच्या व्याख्यानाने बालसंस्कार शिबिराची सांगता.

महाराष्ट्र पाठ्यपुस्तकातील कवितांचे सुप्रसिध्द लेखक हनुमंत चांदगुडे

केडगाव – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान दौंड – हवेली आयोजित निवासी बाल संस्कार शिबिराचा सांगता समारंभ रविवार दिनांक १७/५/२०२६ रोजी महाराष्ट्र पाठ्यपुस्तकातील कवितांचे सुप्रसिध्द कवी हनुमंत चांदगुडे सरांच्या व्यख्यानाने व मातृ-पितृ पूजनाने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मल्हारी दादा सोडनवर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीराचे ही तिसरे वर्ष होते.या शिबिरात मुलांना व्यायाम,योगा,प्राणायाम,ध्यान,झुंबाडान्स,तबला,पखावज,हरिपाठ,पावल्या,श्लोक,लाठीकाठी,तलवारबाजी,दांडपट्टा,स्वीमिंग,ट्रेकिंग,
कराटे,आट्यापाट्या,क्रिकेट,लगोरी,वृक्षारोपण व संवर्धन,सुंदर हस्ताक्षर लेखन,आर्ट & क्राफ्ट,संभाषण कौशल्य,करीअर मार्गदर्शन इ.विषय शिकविण्यात आले.या शिबिरात शिक्षक म्हणून मल्हारी सोडनवर,सुनिल माने सर,दिनकर महाराज देवडकर,दिपाली इंगुळकर मॅडम,महादेव महाराज गरदडे यांनी काम पाहीले.तसेच सिद्धार्थ चव्हाण साहेब,मनोज जैन,डॉ.स्वाती लवंगरे,संतोष चव्हाण,संतोष माने,विठ्ठल सोडनवर सर,पाटील जाधव सर,मिलींद टेंगले सर,चंद्रकांत राहिंज सर,सुरेश जाधव सर,प्रशांत मुथ्था,सतिष कुंभार,सुर्यकांत मेमाने यांनी विवीध विषयांचे मार्गदर्शन केले.सांगता समारंभाच्या वेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांनी त्यांची महाराष्ट्र पाठ्यपुस्तकातील आठवीच्या पुस्तकातील आळाशी ही कवीता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.त्यांनी सध्या महाराष्ट्राची परिस्थीती पाहता अशा बालसंस्कार शिबीरांची गरज असल्याचे नमुद केले. शिबिरातील विद्यार्थ्यांकडून माता-पित्यांचे पूजन करून त्यांना आई-वडिलांचा व वडीलधाऱ्या माणसांचा आदर राखण्याची शपथ देण्यात आली. तसेच जिवणात कधीच कुठले व्यसन करणार नाही अगर व्यसनी माणसाची संगत करणार नसल्याची शपथ देण्यात आली.संस्थेचे उपाध्यक्ष माऊली ठोंबरे यांनी सर्वांचे आभार मानले.शिबिरातील प्रशिक्षणार्थींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून संस्थेचे संचालक अनिल गडधे यांनी सभागृहात कायमस्वरूपी फॉगर बसवून दिले.या शिबीरास हॉटेल रॉयल- सतीश बारवकर,साई आशीर्वाद ट्रॅव्हल्स- बंडूशेठ नेवसे,श्रीनाथ मंडप- गंगाराम जाधव,देशमुख डेकोरेटर्स – जितेंद्र देशमुख व हनुमान मंडप – बापू जगताप यांनी विशेष सहकार्य केले.संस्थेच्या अध्यक्षांनी श्रद्धा व अंधश्रद्धा याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करून सध्या शोशल मिडीयाचे फायदे -तोटे व ऑनलाईन फ्रॉड कसे होतात व त्यापासून कसे वाचायचे या संदर्भात मार्गदर्शन केले. हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानच्या संचालकांनी व इतर सभासदांनी सहकार्य केले.

  • अशोक अडसूळ ( मुख्य संपादक )

    ​मी अशोक भागुजी अडसूळ, 'सत्यप्रकाश न्यूज'चा मुख्य संपादक. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे आणि समाजाचे प्रश्न मांडणे हे माझे ध्येय आहे. आमच्या पोर्टलची मूळ मूल्ये म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा होय. पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी आम्ही प्रसिद्ध करत नाही. आपल्या परिसरातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि समाजोपयोगी बातम्या वाचण्यासाठी आमच्याशी जोडून राहा.आमच्या या प्रवासात आपणही सहभागी व्हा. आपल्या भागातील बातम्या किंवा समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला 9561708090 या क्रमांकावर संपर्क करा.

    Related Posts

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वरवंड :- जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या १३ जुलै रोजी वरवंड मुक्कामी येत आहे. सदर सोहळ्यासाठी महाराष्ट शासन व वरवंड ग्रामपंचायतच्या वतीने…

    Continue reading
    एक दिवस तरी वारी अनुभवावी ! यवत ते वरवंड पायी वारीचा अहिल्यादेवी होळकर दिंडीचा उपक्रम .

    सत्यप्रकाश न्यूज :- संदिप चव्हाण केडगाव :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडी सोहळ्याच्या वतीने सोमवार दि.१३.७.२०२६ रोजी ” एक दिवस तरी वारी अनुभवावी ” या उपक्रमाचे आयोजन यवत ते वरवंड…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे नक्की वाचा

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या टपरीतच मटका जुगारीचे साम्राज्य ! मटका चालवणारांचा आका कोण ? कारवाईची ग्रामस्थांची मागणी !

    डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले !

    डॉ. उमेश कणकवलीकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले !

    विटगन इंडिया प्रा. लि.कंपनीने वारकऱ्यांसाठी नित्यउपयोगी वस्तूंच्या किट वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी !

    विटगन इंडिया प्रा. लि.कंपनीने वारकऱ्यांसाठी नित्यउपयोगी वस्तूंच्या किट वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी !

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; मोफत औषधांचे वाटप !

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; मोफत औषधांचे वाटप !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या वरवंड मुक्कामी ! चौफुला येथे दुपारचा विसावा ! वारकऱ्यांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी !

    दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

    दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !