
बोरीपार्धीत सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताहामध्ये काकडा भजन, हरिपाठ ,कीर्तन ,हरिजागर असे कार्यक्रम करण्यात आले. हरिभक्तीपरण माधवजी महाराज रसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती झाली. अतिशय उत्साहामध्ये या सप्ताहाचे आयोजन दत्त सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले होते .गावातील अनेक मंडळींनी दानधर्म व देणगी देऊन या सत्कारया सहकार्य केले.
